सुदर्शनराव,

आपली व्यथा ही आज़ प्रत्येक डोळस मराठी माणसाची व्यथा बनली आहे. लालूताईंनी मांडलेला शिष्टाचाराचा मुद्दा योग्यच आहे. पण समोरचा माणूस शिष्टाचार पाळत असेल तरच आपण तो पाळण्यात अर्थ आहे असे वाटते. अमराठी भारतीय काय अथवा अनिंग्लिश अभारतीय काय, ते ज़र आपल्यासमोर आपल्याला माहीत नसलेल्या भाषेत बोलत असतील तर आपणही बिनदिक्कत तसे करायला हरकत नाही असे वाटते.

प्रसंगी स्वतःकडे वाईटपण घेऊन मराठीपण टिकवले पाहिजे असे वाटते. विशाल हृदयाच्या मराठी माणसाने ज़ाणीवपूर्वक काही ठिकाणी संकुचितपणा केला पाहिजे असे वाटते.

आपला
(संकुचित) प्रवासी