वरदाताई

हा लेख सुधा चांगला आहे ..!! आपण श्री प्रवासी महोदयांना सांगितलेले मला पटले. ह्यापुढे लेखात जरा क्लिष्टता वाढत जाईल असे वाटते पण त्याशिवाय तो पूर्णं लेख होणारच नाही..मी बराच वेळा आपले लेख दोन तीनदा वाचते नाहीतर निवांतपणे वाचते तो लेख छापून घेऊन.. म्हणजे काही क्लिष्ट गोष्टी वाचताना एकाग्रता ढळत नाही आणि अजून एक म्हणजे आपल्या लेखांमध्ये आपण कंसामध्ये त्याचे इंग्रजी प्रतिशब्द देता ही पद्धत खरंच छान आहे कारण एखादी गोष्ट जर मला मराठी मधून कळली नाही तर इंग्रजी शब्दांमूळे रीलेट करणे सोपे जाते कारण माझे असे कधी कधी होते की एखादा शब्द किंवा ती कन्सेप्ट मला इंग्रजी मधून जास्ती पटकन कळते.. ! आता प्रतिसाद जास्ती लांबवत नाही पण तुम्हाला कळले असेल मला काय म्हणायचे आहे ते.. असो.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत

गार्गी.