समोरचा शिष्टाचार पाळत नाही म्हणून आपण पाळायचा नाही असे वागण्यापेक्षा समोरच्याला शिष्टाचार शिकवण्याचा मार्ग जास्त चांगला आहे.

एक किस्सा सांगतो, मी एकदा जपानी कंपनीमध्ये कामानिमित्त गेलो होतो. त्यांची मीटिंग जपानी भाषेत सुरू झाली. मला उमजेना, म्हणून मी मीटिंग मध्येच तोडून सर्वांना उद्देशून सांगितले की मला तुमची भाषा कळत नाही, आपण सर्व जमल्यावर जर आपण सर्वांना समजेल अशा भाषेत संभाषण केले तर ते योग्य होईल. खरेतर, त्या मीटिंग मध्ये केवळ मलाच जपानी भाषेचा गंध नव्हता. पण माझ्यासाठी त्यांनी सर्वांनी इंग्रजीत संभाषणाला सुरुवात केली. त्यानंतर तेथील अधिकाऱ्याने सांगितले की हे शिष्टाचार त्यांना आजवर माहीतच नव्हते. त्याने माझे याबद्दल आभारही मानले. त्यानंतर जेव्हा माझा त्या कंपनीशी संबंध आला, तेंव्हा सर्वजण इंग्रजीमध्ये संभाषण करत.

सांगायचा मुद्दा, बऱ्याच वेळा समोरच्याला हे शिष्टाचार माहीत नसतात. ते त्याला जर समजावून दिले तर यासारखे प्रश्न उपस्थित राहणार नाहीत.

--ध्रुव.