छाया,
कवडीचुंबक मी खरी असुनही औदार्य माझे पहा!
मैत्रीला अपुल्या स्मरून दिधला आहेर मोती दहा
(खरे तर 'सहा'च देणार होते पण नीलहंसाने 'दहा' म्हटल्यामुळे १० देणे भाग पडले.)
मीरा
--------------
आता हे सर्वांसाठी-
पहिली ओळ शार्दूलविक्रीडिताचे नियम काटेकोरपणे पाळत नाही. तरीही चालीत म्हणता येत असल्याने तसेच दडपून पाठवले आहे!
पहिल्या ओळीत २० अक्षरे आहेत म्हणजे १ अक्षर जास्त आहे. तसेच सुरुवातीच्या ५ अक्षरांचा लघुगुरु क्रम
̱ ̱ ̱ ̮ ̮
असा असायला हवा. तो
क̮ व̮ डी̱ चुं̱ ब̮
असा आहे. माझ्या माहितीप्रमाणे अक्षरगणवृतात दोन लघु अक्षरांचा गुरु होत नाही. तरी हे चालीत कसे म्हणता येते? प्रस्तुत ओळीसाठी असेही कोणी म्हणेल की कव चा उच्चार आपण कौ असा करत आहोत म्हणून तो गुरु झाला. परंतु क व ऐवजी कोणतीही दोन लघु अक्षरे घेतली तरी चालीत म्हणता येत आहे. त्यामुळे माझा जरा गोंधळ झाला आहे. जाणकारांनी कृपया उलगडा करावा ही विनंती.
मीरा