काल आमच्या शेजारणीचे आणि सौ. चे संभाषण चालू होते. दोघांना एकत्रित कोठेतरी जायचे होते आणि ऐनवेळेस सौ चा विचार बदलला आणि ती म्हणाली, " तुम्ही समोर जा आणि मी नंतर येते".

या संभाषणानंतर अनेक वर्ष छळणाऱ्या प्रश्नाची उकल झाल्यासारखे वाटले. ग्रामीण भागात म्होरं हा शब्द चांगल्यापैकी वापरला जातो. शहरी लोक म्होर हा शब्द ऐकताच गावंढळ शब्द म्हणून हसतात. समोर या शब्दातूनच म्होरं  हा शब्द आला असावा असे वाटते.

त्याच प्रमाणे होता / नव्हता पासून व्हता हा शब्द आला असावा.

जाणकारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी.