मीराताई, छायाताई क्या बात है! अहो ह्या समस्यापूर्तींसाठी दहा मोती दहादा आहेर म्हणून द्यायला हवेत. छान छान!
माझ्या माहितीप्रमाणे अक्षरगणवृतात दोन लघु अक्षरांचा गुरु होत नाही. तरी हे चालीत कसे म्हणता येते? प्रस्तुत ओळीसाठी असेही कोणी म्हणेल की कव चा उच्चार आपण कौ असा करत आहोत म्हणून तो गुरु झाला. परंतु क व ऐवजी कोणतीही दोन लघु अक्षरे घेतली तरी चालीत म्हणता येत आहे.
गुरू ऐवजी दोन लघु वापरण्याची सोय अक्षरगणवृत्तात नाही कारण अखेर ही 'अक्षर'गण वृत्ते आहेत ज्यात अक्षर संख्या नियमात बसायला हवी. कारण ह्यात अक्षरांनुसार गण पडतात.
परंतु मात्रांचा विचार केल्यास दोन लघुच्या १+१= २ मात्रा आणि एका गुरूच्या २ मात्रा असल्याने म्हणताना फरक पडत नाही.
उदा.-
ग̮ड̮द̮ नि̮ळे̱ ग̮ड̮द̮ नि̮ळे̱ ज̮ल̮द̮ भ̮रु̮नि̮ आ̱ले̱
शी̱त̮ल̮ त̮नु̮ च̮प̮ल̮ च̮र̮ण̮ अ̮नि̮ल̮ग̮ण̮ नि̮घा̱ले̱
( किती लघ्वाक्षरे!!!!)
ह्या दोन्ही चरणात मात्रा समान आहेत परंतु अक्षरसंख्या भिन्न आहे. त्यामुळे चाल, लय चुकत नाही, पण हे अक्षरगणवृत्तात बसणार नाही.
ह्यावेळी सवलत घ्या मीराताई! पुढच्यावेळी घरचा आहेर मिळेल हो! ( ह. घ्या. )