फिरंग्यांनी आपल्यावर आक्रमण केले, हे व अश्याप्रकारची वाक्य आपण इतिहासाच्या पुस्तकात अनेकदा वाचली आहेत.  यातील 'फिरंगी' म्हणजे परदेशी  (गोरे लोक) असा आपला समज झालेला असतो.

मात्र, फिरंगी हे नाव इटलीतील, फ़्लोरेन्स या राज्यात राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे, हे किती जणांना ठाऊक आहे?

फ़्लोरेन्सला तेथील प्रांतीय  भाषेत फिरेंझ  म्हणतात.  पूर्वी या फ़िरेंझमध्ये राहणाऱ्या   व्यापाऱ्यांचा , भारताशी  दळणवळणांमार्फत व्यापार चाले, त्यामुळे हे फ़िरेंझचे -फ़िरंझी ,पुढे =फिरंगी झाले.

(एखादवेळेस, त्यांच्या रंगाच्या कातडीवरून , फिरंगी हे नाव आपल्या येथील लोकांनी ठेवले असावे असा माझा कयास आहे.

 फिरंगी - फिका रंग = अती गोरी कातडी.)

मात्र त्यानंतर येणारे, डच,फ्रेंच,पोर्तुगीज,ब्रिटिश हे सर्वच जण आपल्यासाठी फिरंगी झाले.

अजून कुणालाही यात मार्गदर्शन करायचे असल्यास जरूर करावे. तेवढीच माझ्या माहितीत भर पडेल.