उत्तम कथा. शेवटचा भाग वाचेपर्यंत उत्कंठा खरोखरीच ताणली गेली होती. मला कुमारचा संशय आला होता तो अगदीच निकामी ठरला. संरक्षण खात्याच्या 'कारभारा'विषयी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत आणि त्या माहितीचा वापर छानच पद्धतीने केला आहे. मोठी कथा असूनही कुठेही कंटाळवाणी न होता उलट पुढच्या भागांची प्रतिक्षा करायला लावणारी होती. अशा आणखी कथा वाचावयास मिळोत.