वरदा,
हाही भाग सुरेख आहे हो.
काही शंका -
१. विभवांतर असल्यामुळेच विद्युत्पात होतो असे दिसत आहे. मग ऋणविद्युत्पात कोणता व धनविद्युत्पात कोणता? ऋणविद्युत्पात व धनविद्युत्पात ह्यांमधील फरक स्पष्ट कराल काय?
२. समज़ा ध आणि ऋ ही दोन स्थाने आहेत. ध धनप्रभारित आहे व ऋ ऋणप्रभारित आहे. ध कडून ऋ कडे अथवा ऋ कडून ध कडे अशी विज़ेला काही दिशा असते काय? असल्यास ती कशी ठरते?
३. परीविद्युत्पात
परीविद्युत्पाताच्या तुलनेत प्रखर असणारे नीलझोतांचे प्रकाशचित्रण
परीविद्युत्पात म्हणजे काय? हा शब्द ह्या आधी येऊन गेला आहे काय? आम्ही विसरलो की काय?
आपला
(मंदमती) प्रवासी