हाही भाग सुरेख आहे हो.
--------धन्यवाद
१. विभवांतर असल्यामुळेच विद्युत्पात होतो असे दिसत आहे. मग ऋणविद्युत्पात कोणता व धनविद्युत्पात कोणता? ऋणविद्युत्पात व धनविद्युत्पात ह्यांमधील फरक स्पष्ट कराल काय?
---------- विद्युत्पातासाठी सामान्यतः ढगाच्या ऋणप्रभारित भागाकडून सुरुवात होते. त्यामुळे बरेचसे विद्युत्पात हे ऋणविद्युत्पात असतात. मात्र काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ढगाच्या धनप्रभारित विभागाकडून विद्युत्पातासाठी आवश्यक घटनांची सुरुवात होते, त्यावेळी तो धनविद्युत्पात असतो. थोडक्यात असे म्हणता येईल की ज्या प्रभारित विभागाकडून विप्रभारणाच्या प्रक्रियेस सुरुवात होते त्या विभागाच्या प्रभारावरून तो ऋण वा धन विद्युत्पात आहे हे ठरवितात.
२. समज़ा ध आणि ऋ ही दोन स्थाने आहेत. ध धनप्रभारित आहे व ऋ ऋणप्रभारित आहे. ध कडून ऋ कडे अथवा ऋ कडून ध कडे अशी विज़ेला काही दिशा असते काय? असल्यास ती कशी ठरते?
---------------- विद्युतधारा म्हणजे इलेक्टॉन्सचे वहन. एखाद्या स्थानाच्या सापेक्ष प्रभारवहनाचा दर म्हणजे विद्युतधारा. विद्युतधारा वाहते त्यावेळी हे इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात. परंतु सर्वमान्य संकेतानुसार विद्युतधारेची दिशा ही धनप्रभारांच्या वहनाच्या दिशेनुसार मानतात. त्यामुळे धनप्रभार हे ध कडून ऋ कडे पाठविले जात असल्याने विजेची दिशा ध कडून ऋ कडे असते.
परीविद्युत्पात म्हणजे काय? हा शब्द ह्या आधी येऊन गेला आहे काय? आम्ही विसरलो की काय?
--------- ह्याचे स्पष्टीकरण दुसऱ्या प्रतिसादामध्ये दिलेले आहे. परी विद्युत्पात म्हणजेच अद्भुत विद्युत्पात.