श्री गावन्ढळ,(जरा विचित्र वाटते म्हणायला पण नाईलाज आहे..)
लेख छान जमला आहे.. खरेच,आज मोबाईल वापरणार्यांची भूमिका 'पता नही तुम बिन हम ईतने साल कैसे जिये. अब न होंगे जुदा' अशी असते..
मला आठवले, मोबाईल नवीन असताना 'मी बसमधे आहे.१० मिनीटात घरी येईन' हे सांगायला एक कॉल, मग कोणाला तरी असाच एक बिनमहत्वाचा एस.एम.एस, मग त्या एस.एम.एस वर प्रत्युत्तर, प्रत्युत्तरावर प्रति-प्रति उत्तर असे चालू.. पण बसमधे किंवा लोकलमधे किंवा ऑफ़ीसमधे माझ्या मोबाईल वर एस.एम.एस. ची रिंग निनादली कि स्वत:ला कसले 'व्हि.आय.पी' वाटायचे राव!!! आणि त्यावेळी 'भारत संचार निगम मर्यादीत' ची 'पहिल्यांदा आमचे प्री-पेड कार्ड घेणार्याला अमर्यादीत एस.एम.एस फ़ुकट' हि योजना होती. ('माकडाच्या हाती कोलित' या सुरावर 'अनुच्या हाती मोबाईल' अशी नविन म्हण सुरु करावी कि काय???)
मग जरा मुरल्यावर मोबाईलचे इतर सु /(दुर्) उपयोग कळून आले.
सु-उपयोग:
१. नको असलेल्या व्यक्तीशी लांब संभाषण 'आता मोबाईलवरुन बोलते आहे, ठेवते, नंतर डिटेलमधे कॉल करेन..' म्हणून टाळता येते.
२. नको असलेला कॉल घेणे 'जरा मिटींग चालू होती, फ़ोन सायलेंट मोड वर होता.रिंग ऐकूच आली नाही.' म्हणून टाळता येते.
३. एखाद्या ठिकाणी जायला निघण्यास उशिर झाल्यास आणि त्या व्यक्तीचा फ़ोन आल्यास 'आता रस्त्यात आहे. येतेच आहे.जरा दुचाकी बंद पडल्याने उशिर झाला.' म्हणता येते.
पण अर्थातच 'अति सर्वत्र वर्जयेत्'..प्रत्येक युक्ती अधून मधून पुरवून आणि शक्यतो एका व्यक्तीबरोबर एकदाच वापरल्यास प्रभावी..नाहीतर 'मी आजच्या दिवसात फ़ोन करेन. मोबाईल शांत मोड वर ठेवल्यास डोळ्यासमोर ठेव' किंवा 'तू ठेव. मीच आता परत फ़ोन करते/तो.' अशी प्रत्युत्तरे मिळून पोपट होण्याची शक्यता आहे.
अजून काही युक्त्या सुचल्यास कळवाव्या..
आपली अविश्वासू,
अनु.