रंगतदाऱ लेखमाला होत चालली आहे वरदाताई!! पुढील भागांची उत्सुकता लागली आहे. भौतिकशास्त्र तर पहिल्यापासूनच आवडता विषय होता. मला भौतिकशास्त्राचे प्राध्यापक द. वि. बादवे यांचे वाक्य आठवते आहे. ते म्हणत "भौतिकशास्त्र हे जगातले सगळ्यात सुंदर शास्त्र आहे कारण सकाळी उठून तोंड धुण्यासाठी नळ उघडण्यापासून (नळ उघडण्यासाठी घूर्णन बलाचा (torque) प्रयोग होतो) ते रात्री झोपेपर्यंत पदोपदी भौतिकशास्त्र आजमावता येते.. अगदी आपण रस्त्यावरून चालत असतानाही.. (न्यूटनचा क्रिया-प्रतिक्रियेचा तिसरा नियम)"
आपल्या लेखमालेतून भौतिकशास्त्राचे निसर्गातले प्रबळ अस्तित्त्व समोर येत आहे. मला भौतिकशास्त्र आणि हवामान याबद्दल जास्त माहिती नव्हती, पण शाळेत असतानापासून "विद्युतधारा" हा नेहमीच भौतिकशास्त्राच्या पुस्तकातला कुतुहलाचा धडा राहिला आहे. असो.
"वारा सुटला.." च्या निमित्ताने एक प्रश्न विचारायचा राहून गेला होता, तो इकडे विचारून घेईन म्हणतो. माझा असा अंदाज होता की त्या लेखात तुम्ही वादळाबद्दलसुद्धा काही माहिती देणार आहात/भाष्य करणार आहात. पण त्या लेखाचा आवाका केवळ पर्जन्यकालातील वारे किंवा त्यासाठीच्या पूर्वस्थिती नि उत्तरस्थिती दरम्यानचे वारे असा असेल तर "वादळ" हा पूर्णपणे वेगळा लेख होऊ शकेल, नाही का?! आपला "वादळ" या विषयावर लेख येणार असेल तर माझा प्रश्न मी त्या वेळपर्यंत राखून ठेवतो. विषयांतराबद्दल क्षमस्व.
सुंदर छायाचित्रांबद्दल शशांकरावांचेही मनःपूर्वक आभार. वार्ताहर आणि छायाचित्रकार अशा दुहेरी भूमिकेतून आता ते मनोगतींना त्यांच्या त्याही कलांचा आनंद लुटायला देत आहेत.
शुभेच्छा.
कळावे.
(जिज्ञासू)चक्रपाणि