"वारा सुटला.." च्या निमित्ताने एक प्रश्न विचारायचा राहून गेला होता, तो इकडे विचारून घेईन म्हणतो. माझा असा अंदाज होता की त्या लेखात तुम्ही वादळाबद्दलसुद्धा काही माहिती देणार आहात/भाष्य करणार आहात. पण त्या लेखाचा आवाका केवळ पर्जन्यकालातील वारे किंवा त्यासाठीच्या पूर्वस्थिती नि उत्तरस्थिती दरम्यानचे वारे असा असेल तर "वादळ" हा पूर्णपणे वेगळा लेख होऊ शकेल, नाही का?! आपला "वादळ" या विषयावर लेख येणार असेल तर माझा प्रश्न मी त्या वेळपर्यंत राखून ठेवतो. विषयांतराबद्दल क्षमस्व.

---------- ह्या लेखांची शीर्षके माझी आवडती कविता

आभाळ वाजलं धडाऽड धूम
वारा सुटला सू सू सूऽम
वीज चमकली चक् चक् चक्
जिकडे तिकडे लख लख लख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाहिलं सो सो सो
पाण्यात बोट सोडली सोडली
हातभर जाऊन बुडली बुडली
बोटीवर बसला बेडुक
तो ओरडला डरांव डुक

मधील ओळी त्याच क्रमाने घेतल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या लेखांकात मी वादळविषयक लिहीन असा समज झाला असल्यास क्षमस्व. मात्र आपले प्रश्न जरूर लिहा, त्यास प्रतिसादामध्ये/व्य. नि. मधून वा लेख/लेखमाला लिहून :) उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. 

प्रतिसादाबद्दल व लेखमाला आवडल्याबद्दल आभार. भौतिकशास्त्राबद्दलचे तुमच्या शिक्षकांचे विचार योग्य आहेत. जगातील सर्व शास्त्रप्रकार हे भौतिकशास्त्राच्याच उपशाखा आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.