एखाद्यास टाळायचे असेल तर त्याचा फोन आल्यावर, 'मी अमुक-अमुक ठिकाणी (दूरच्या परिसरात) आहे, आत्ता येऊ शकत नाही' वगैरे सबब देता येते. फक्त असे सांगताना आपण आपल्या किंवा कोणाच्या तरी घरात असले पाहिजे. नाहीतर ती व्यक्ती आपल्याला पाहात असण्याची शक्यता असते.

हल्ली म्हणे वेगवेगळ्या आवाजांचे तुकडे पार्श्वसंगीत म्हणून मिळतात. म्हणजे, 'मी रहदारीच्या मुरंब्यात अडकलो आहे' हे कारण देताना घरात बसूनही आजूबाजूच्या रहदारीचे आवाज, गाड्यांच्या शिंगांचे आवाज वगैरे पार्श्वसंगीत चालू ठेवता येते. घरी बायकोला (किंवा नवर्‍याला) 'अजून ऑफिसच्या कामातच अडकलो (किंवा अडकले) आहे' अशी थाप ठोकताना, ऑफिसचे पार्श्वसंगीत चालू करायला विसरू नये. तरूणांई साठी कॉलेजच्या वातावरणाचेही पार्श्वसंगीत मिळते.  (म्हणे).