१० अब्ज व्होल्ट्स वगैरे वाचून छाती दडपली. वीज एखाद्या व्यक्ती/पशू वर पडली तर काय होत असेल याची कल्पनासुद्धा न केली तरच बरे!! "सावज" हा शब्दप्रयोग अतिशय आवडला वरदाताई!! चपखल बसला (किंवा बसवला!! ः)) आहे हा शब्द इकडे!!

काही प्रश्नः

प्रश्न १)

इमारतींवर जे विद्युतरोधक (की वाहक?) बसवलेले असतात जे इमारतींवर पडणारी वीज जमिनीत वाहून नेतात, ते जर नसतील तर इमारतीला किती नुकसान होऊ शकते? होणारे नुकसान, हे वाढलेले तापमान आणि दाब यांच्यामुळेच होते, की इतरही (या दोघांव्यतिरिक्त आणखीही किंवा ही दोन वगळून)काही कारणे आहेत?

प्रश्न २)

आपल्यापैकी बरेच जण, विजा कडाडत असताना झाडाखाली आडोसा घेऊ नये, असे ऐकत आणि/किंवा ऐकवत आलो आहोत. लेखातील विवेचनावरून "असे का" याची पुसटशी कल्पना येते खरी, पण झाडाखाली उभे असताना झाडावर वीज पडली तर खाली उभे असलेल्या व्यक्तीस कशी काय इजा (प्राणघातक! "इजा" हा अगदीच मिळमिळीत शब्द आहे बहुतेक!!) होते? झाड आणि व्यक्ती मधल्या हवेच्या रेणूंमध्ये वीज पडल्यामुळे होणारे बदल/काही क्रिया याला कारणीभूत असतात का? असल्यास नक्की काय क्रिया होते? (हे खरोखरच असे होत असेल असे गृहीत धरून एकूणच प्रश्न आणि अंतर्भूत उपप्रश्न विचारले आहेत.. चू. भू. द्या. घ्या.)

(जिज्ञासू)चक्रपाणि