वरदा,
लेख छान आहे. आकृत्या, त्यांचे मराठी संस्करण करण्यासाठी घेतलेले कष्ट व त्यांना अकारविल्ले दिलेली मराठी नावे हे सगळे कौतुकास्पद आहे. समाप्तीचा परिच्छेद मस्त ज़मला आहे! वा!
कडकडाट कसा होतो हे आपण अतिशय सोपे करून समज़ावून सांगितले आहे.
वीज प्रत्यक्ष जमिनीवर न पडता सामान्यतः जमिनीवरील वस्तूवर (मनोरा, इमारत, झाड, घर अशा सामान्यतः टोकदार व उंच वस्तूवर ) पडते
वस्तू उंच हवी हे समज़ले पण टोकदार का असावी लागते हे सांगाल काय?
ढगाच्या तळाशी दुभंग विभव (breakdown potential) तयार झाले
विभव दुभंग कधी होते? दुभंग विभवाची किंमत नेहमी एकच असते की ती बदलते? असल्यास किती? हे बदलणे कशावर अवलंबून असते?
-----
चार भागांची ही लेखमाला सुरेख झाली आहे. आवडली. ज्ञानात भर पडली.
आपला
(वाचक) प्रवासी