धडाडधूम ते लखलखलख हा प्रवास रंजक होता. विषय छान निवडले होते. प्रत्येक भागातील विषयाची नीटनेटकी मांडणी, प्रत्येक भागाची योग्य लांबी, उत्सुकता वाढवून वाचण्यास उद्युक्त करणारी शीर्षके, मराठी प्रतिशब्दांचा वापर पण जिथे आवश्यक तिथे कंसात दिलेले मूळ इंग्रजी शब्द, आणि सहजसोपी ओघवती लेखनशैली यामुळे ही लेखमालिका अतिशय वाचनीय झाली यात शंकाच नाही. अर्थात लेखिकेची विषयावर असणारी हुकमतही त्याला कारणीभूत असावी.
धन्यवाद.