दिलेली मराठी नावे हे सगळे कौतुकास्पद आहे. समाप्तीचा परिच्छेद मस्त ज़मला आहे! वा! कडकडाट कसा होतो हे आपण अतिशय सोपे करून समज़ावून सांगितले आहे.

--------- मनःपूर्वक धन्यवाद

वस्तू उंच हवी हे समज़ले पण टोकदार का असावी लागते हे सांगाल काय?

---------- प्रभाराचे वस्तूपृष्ठभागावरील वितरण हे वस्तूच्या आकारावर अवलंबून असते. घनगोल वस्तूवर प्रभार सर्वत्र सारख्या प्रमाणात पसरतो, मात्र टोकदार वस्तूच्या टोकाकडे प्रभारांची दाटी आणि पसरट भागाकडे कमी प्रमाणात प्रभार असे वितरण होते. टोक जेवढे निमूळते तेवढी प्रभारांची दाटी अधिक. त्यामुळे वस्तू टोकदार असावी लागते. इमारतींच्या सुरक्षिततेसाठी वापरला जाणारा विद्युतदांडा म्हणूनच नेहमी बाणाच्या टोकासारखा वा त्रिशूळाच्या आकाराचा (जास्त टोके!!) असतो.

विभव दुभंग कधी होते? दुभंग विभवाची किंमत नेहमी एकच असते की ती बदलते? असल्यास किती?  हे बदलणे कशावर अवलंबून असते? 

------ प्रभारवहनाचा मार्ग तयार होण्यासाठी ढगाच्या तळाशी दुभंग विभव तयार होते ज्याचा परिणाम म्हणून तेथील हवेचे आयनीभवन होऊन मार्ग तयार होतो. वहनमार्गातील प्रत्येक टप्पा निर्माण होण्यासाठीही दुभंग विभव आवश्यक असते. हे दुभंग विभव दर्शकाला ढगाकडून किती प्रभारांचा पुरवठा होतो त्यावर तसेच हवेच्या आयनीभवनासाठी किती विभवाची गरज असेल त्यावर ठरते. त्यामुळे विभवाची किंमत एकच असेल असे नाही. हवेतील विविध वायूंचे व बाष्पाचे प्रमाण, हवेचे तापमान वगैरे गोष्टींवर त्या हवेचे आयनीभवन होण्यासाठी किती दुभंग विभव लागेल हे ठरते. ते तेवढे तयार झाले की दर्शक पुढे सरकू शकतो. दुभंग विभवाची नक्की किंमत वा आवाका मला सांगता येणार नाही, क्षमस्व. आणखी वाचन करून उत्तर सापडल्यास जरूर कळवेन.

चार भागांची ही लेखमाला सुरेख झाली आहे. आवडली. ज्ञानात भर पडली.

---------- पुन्हा धन्यवाद.