हा लेखही आवडला. एकदोनच शंका आहेत.
--------- धन्यवाद.
वीज चमकताना दिसते त्यावेळी ती जमिनीवर कुठेतरी पडलेली च असते का? की नुसत्या ढगांची टक्कर होऊनही वीज चमकू शकते?
-------- वीज चमकताना दिसते म्हणजे ती जमिनीवर पडलेलीच असते असे नाही. दोन ढगांमधील विरूद्ध प्रभारित विभागांदरम्यानही विद्युत्पात होतो तेव्हा वीज चमकते, मात्र ढगांची टक्कर झाल्यामुळे नाही. भाग ३ मध्ये आंतर्मेघ विद्युत्पात पहा.
दुसरे म्हणजे ३०, ००० ऍम्पियर एवढा विद्युत्प्रवाह, १० अब्ज व्होल्ट्स एवढे विभवांतर या मानाने ५ कूलोंब विद्युत्भार हा आकडा फार कमी वाटतो. की माझी काही गफलत होते आहे?
--------- ५ कूलोंब हा दर्शकातील विद्युतप्रभार हा जोडणीपूर्वीचा आहे. मात्र एकदा जोडणी झाली की दर्शक+इतर फाट्यातील+ढगातील ऋणप्रभारित विभाग अशा सगळ्यांकडून एकत्रितरित्या वहनमार्गे वाहणारा प्रभार मोठा असतो आणि म्हणून विद्युतधाराही मोठी असते.