ध्रुव ,

     आपल्या मताशी १०० % सहमत.  सध्याच्या काळात साधूंचे पीक खूप येऊ लागले आहे. त्याना अनुयायीही तसेच लाभतात. शासन अधिकारीही त्यांचा पाठपुरावा करतात ,कारण मतांची शिदोरी तिथे भरपूर मिळते. या तथाकथित महाराजांमुळे कुणाचे , कसे फ़ायदे होतात हे एक गौडबंगाल आहे. पीडीत , असहाय्य जनतेच्या मानसिकतेचा गैरफ़ायदा या समुहाकडून लुटला जातो. धर्माच्या नावाखाली चाललेला हा मुखवटा बाजार निषिद्ध आहे . समाजातील प्रत्येक व्यक्तीने नीर क्षीर न्यायाने यावर निर्णय करायचा आहे. ज्याच्याजवळ ध्येय ,जिद्द, आत्मविश्वास ,प्रयत्नशीलता आहे तो या मार्गाला जाणार नाही.