ध्रुव....
मुंबई व औरंगाबादच्या विमानतळांवर घालण्यात आलेला हैदोस हा फक्त निषेधार्ह नसून संतापजनक असाच आहे !
सर्वप्रथम - माझ्या मते.... देवाच्या उपासनेसाठी कोणते माध्यम निवडावे हे ज्याने त्याने ठरवायचे असते !
मी व्यक्तिशः अनिरुद्ध बापू म्हणा की,  नाना महाराज तारणेकर म्हणा.... नरेंद्र महाराज असोत की, आसाराम बापू असो.... सर्वांनाच साधू नव्हे - संधीसाधू समजतो ! माझे मत द्यायचे झाल्यास व्यक्तिपूजा व बुवाबाजी ही सर्वच थोतांडे आहेत.
सर्व राजकीय पक्षांना कोणता तरी विषय आंदोलनासाठी लागतोच ! ह्यांत भाजपा किंवा सेनेचेच नेते फार वरचढ आहेत असे समजणे म्हणजे 'आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे' असेच म्हणणे झाले. पुर्वप्रधान मंत्री नरसिंह राव तसेच स्व. इंदिरा गांधींनी बुवा लोकांच्या तालावर माना डोलवल्या आहेतच !
इंडियन वाल्यांनी (आजपासूनच त्यातले एयरलाइन्स उडालेय !) नरेंद्र बुवांना जाऊ द्यायला नकोच होते. "दंड की डंडा काहीही असो, आम्ही आमच्या नियमांत शिथिलता आणणार नाही - हवे तर तुम्ही तुमचे तिकीट रद्द करा" असे निक्षून सांगावयास हवे होते म्हणजे पुढचे वाद टळले असते- माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र बुवांना बोर्डिंग पास इश्शू केल्यानंतर त्यांना सुरक्षा तपासणीत दंड नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे (व ती ही इंडियन एअरलाईन्स वाल्यांनी नव्हे तर सुरक्षा रक्षकांनी !)  
हे मात्र चुकीचे आहे....चेक-इन प्रोसिजर्स चालू असताना आयएच्या अधिकाऱ्यांनीच त्यावर हरकत घेणे आवश्यक होते - मग पुढील सर्वच भानगडी टळल्या असत्या.
उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आपण आपली कार पार्क करण्यासाठी पुढे-मागे, मागे-पुढे करीत मोठ्या हिकमतीने ती पार्क करावी व बाहेर पडून लॉक करताना एखादा वॉचमन येऊन सांगतो.... "साहब, यहां पार्किंग अलाऊड नही !"
बाकी महाराज म्हणा की पोप जॉन पॉल की इमाम बुखातीर म्हणा सर्वच एकजात ह***र ! हे नक्कीच !