एकनाथ फडके यांनी उल्लेख केलेल्या प्रतिक्रिया वाचून(आणि अशा अनेक प्रतिक्रिया ऐकून)धक्काच बसला आणि-

भाजप,शिवसेनेसारख्या पक्षांना निदान शंभर वर्षे तरी मत द्यायचं नाही असा निश्चय केला; हिंदुत्ववादी संघटना लश्कर,जैश वगैरेंच्या लायकिच्याच असतात याची पुन्हा खात्री पटली;बंगाली बाबांविरूद्धच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला शिवसेना भाजपवाल्यांचा विरोध का हे पुन्हा एकदा समजलं; तोंडाने मोठ्मोठ्या गोष्टी करणारे हिंदुत्ववादी आतून मनाने काय लायकीचे असतात हे पुन्हा एकदा दिसून आलं,

कारण-

ह्या नरेंद्रमहाराजाचा('महाराज' लिहवत नाही) इतिहास माहिती असेल तर एखाद्या ढोंगी माणसाचीच यापेक्षा कमी तीव्र प्रतिक्रिया होईल.मुळात याचा इतिहास लोकांना माहित नाही हेच आश्चर्य आहे.पेपरात आंणि अनेक मासिकांमधे याच्याबद्दल आलेल्या गोष्टी लोकंना माहित नसतिल (किंवा माहीत नसल्याचं दाखवत नसतिल)तर काय बोलणार?
कुठल्यातरी गावातला उनाड आणि आळशी आणि काहिसा गुंड प्रवृत्तिचा हा मुलगा.कामधंदा करवत नाही म्हणून कोणत्यातरी साधूचा 'शिष्य ' बनला.पण तिथेही याने आपले रंग दाखवले.मी वाचलेल्या माहितीप्रमाणे याला साक्षात याच्या गुरूंनीच हाकलून दिलं होतं आणि याने हा धंदा सुरू केल्यावर तो भोंदुगिरी करत असल्याची जाहीर वक्तव्य केली होती!
तर यानंतर याने दोन-चार टगे आणि गावग़ुंड(म्हणजे अगदी ओवाळून टाकलेले गावगुंड. हेच याचे जुने अनुयायी बिझनेस बघतात!) घेवून सरळ्सरळ बाबागिरिचा धंदाच टाकला!आणि तेही कसं?तर जादूटोणा करून!-म्हणजे हवेतून राख/अंगठी काढणे वगैरे-ज्या जादू चार दिवस शिबिरात गेलेली शाळकरी मुलंदेखील करून दाखवतात.याच्या कारवाया वाढल्यावर अंधश्रद्धा निर्मूलनवाले त्याच्या मागे लागले.आणि मग याचे गुंड आणि अंधश्रधावाल्यांविरूद्ध.
मी वाचल्याप्रमाणे सगळ्यात कहर म्हणजे मग  अंनिसवाल्यांनी चक्क याच्या भर सभेत कित्येक लोकांसमोर जाहीरपणे त्याच्या जादूच्या प्रयोगाचं बिंग फ़ोडलं!
यानंतर हा महाराज काही वर्ष जेलमधे होता!आणि बाहेर आल्यावर काही वर्ष त्याने तोंड दाखवलं नाही̱. गेल्या ३-४ वर्षांपासून अचानक मुंबईत याची पोस्टर्स दिसू लागली.मोठमोठ्या सभा होवू लागल्या.याचा प्रभाव आता कोकणात आहे म्हणे,आणि सर्व राजकीय पक्षांमधे connections आहेत.

ही माहिती मी किमान दोन ठिकाणी वाचली आहे. हे प्रकरण पेपरमधेही गाजलं होतं म्हणे.पण बहुधा त्या काळात मी पेपर वाचत नव्हतो.

तर थोडक्यात काय तर असल्या हिंदुत्ववाद्यांना सिमि,लश्कर ई तोयबा वगैरेंसारखीच वागणूक द्यायला हवी.