सचिन,वेदश्री , प्रभाकर,
आभार..
प्रभाकर साहेब, त्याचे काय आहे, आम्ही
"'श्री' मनी म्हणतात, 'आता विसरा रात्री २ ला घरी येणे'
'सौ' मनी म्हणतात, 'जमेल का नीट स्वयंपाक करणे'"
हे लिहीताना फक्त "लग्नाची बेडी श्री आणि सौ दोघांच्या दिनक्रमात मोठा बदल" या अर्थाने लिहिले होते. आणि "श्री" स्वैराचारी न बनताही मित्रांबरोबर बागडून रात्री २ ला घरी येऊ शकतात.. सौ. बद्दल म्हटले तर कदाचित मी स्त्री असल्याने हे सौम्य वाक्य असेल..पण "लग्नाआधी कधी तरी स्वयंपाकघारात लूड्बूड करुन एक पदार्थ बनवणे आणि रोज परिवाराला वेगवेगळे काहीतरी, परीवाराच्या आवडी निवडी डोक्यात ठेउन(तोंडले नको, कार्ले नको, कोबी नको, मुळा नको, आमटी अशी नको, उपमा नको, ई.ई.)" डोक्यातले प्रोग्राम बदलणे " हे माझ्या दृष्टीने सौ. साठी मोठे आव्हान.. हा अर्थ अभिप्रेत आहे..
अर्थात, आपली ओळ पण स्तुत्य आहे..
(सावधान!!कवी शिकत आहे..)