सर्व राजकीय पक्षांना कोणता तरी विषय आंदोलनासाठी लागतोच ! ह्यांत भाजपा किंवा सेनेचेच नेते फार वरचढ आहेत असे समजणे म्हणजे 'आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे' असेच म्हणणे झाले."

ह्यांत खोटे काय लिहिले आहे ?
भाजपा असो की शिवसेना असो,
राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो,
मायावती असो की मुलायम असो,
जयललिता असो की ममता असो,
लालू असो की नितीश कुमार असो,
माकप असो की भाकप असो.......
मला ज्ञात सर्वच पक्षांची नांवे लिहून झालीत येथे..... पण त्यांना प्रत्येक आंदोलनासाठी कुठला न कुठला विषय लागतोच ह्यात चुकीचे काय आहे ???
आपला कोणी बाब्या आहे का ? नसल्यास उगीच का स्वतःवर ओढवून घेताय ? अहो विहंग कुमार, येथे ध्रुव ने एक विषय मांडला पटलावर, त्यावर मी माझे मत मांडलेय आपण माझी वाक्ये "विहंग" ह्या आयडी वर लिहिली आहेत असे धरूनच का चालता.... ?
आजकाल मनोगतावर संशयाचे महाभूत फेरफटका मारायला लागल्याचे जाणवतेय.... कोणी काही लिहिले की ते एका विशिष्ट व्यक्तीबद्दलच आहे असा समज करून लोक स्वतःची लोकप्रियता वाढवण्याच्या प्रयत्नांत असावे....
विहंग कुमार,
असे विकृत प्रतिसाद देत बसून लोकप्रियता मिळतं नाही..... त्यासाठी स्वतःची कलाकृती सादर करावी लागते !