हे रामदेवजी महाराज एक सुखद अपवाद आहेत का ?
मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. परंतू हे महाशय सूर्यनमस्कार आणि योगविद्येचा अतिशय निष्ठेने प्रसार आणि प्रचार करित आहेत. तेही कोणताही मोठा गाजावाजा न करता.
मुख्य म्हणजे हे गृहस्थ लोकांना कोणत्याही चमत्कार साक्षात्काराच्या भूलभुलैयात अडकवत नाहीत अशी माझी माहिती आहे. इथे आलेल्या लोकंना गूण येतो, पण तो नियमित योगासने, प्राणायम आणि सूर्यनमस्काराने ! कोणत्या राखेने किंवा कोठल्या ग्रहशांतीने नाही !
यांच्याबद्दल अजुन काही माहिती असेल तर कृपया इथे लिहिल काय कोणी ? मी यांचा एक कार्यक्रम पाहून प्रभवित झालो आहे. परंतू, हा ढोंगीपणा आहे की यात प्रमाणिकपणा आहे, यबद्दल मी फारसे ठरवू शकलेलो नाही.
रामदेवजींचा हा जर खरोखरच प्रामाणिक प्रयत्न असेल, तर त्यांना प्रणाम !