फडके,
योगविद्या ही अखेर विद्याच आहे ! ते एक शास्त्रही आहे ! माझी वाक्ये वादातीत असू शकतात पण हे सप्रमाण सिद्ध झालेले आहे.
मी स्वतः कुठल्याही व्यायामाला कंटाळाच करीत आलेलो आहे. परंतू चुकून एकदा पहाटे आस्था वाहिनीवर रामदेव महाराजांचा कार्यक्रम बघितला.
ह्या कार्यक्रमात त्यांनी दिलेले शारीरिक व्याधींच्या कारणांचे स्पष्टीकरण व त्यावरील उपाय हे नवशिक्याला व भोंदूला जमणार नाहीत. सर्वांत महत्वाचे म्हणजे ह्युमन ऍनॉटॉमी व केमीकल ऍनेलिसेस त्यांनी इतक्या व्यवस्थित समजावले की माझ्या सारख्या अडाण्यालाही कळेल-
कार्यक्रमांत फक्त बोद्यासारखे बसून न राहता; ते प्रात्यक्षिक करीत होते. पोटांच्या आतली आतडी त्यांनी बाहेरून अशा रितीने गोल फिरवून दाखवली की माझ्या पोटात गोळा उठला.....
मी फक्त तोच एक कार्यक्रम फक्त एकदाच आस्था वाहिनीवर पाहिला परंतू नंतर बऱ्याच जणांचे स्वानुभव ऐकण्यात आलेले आहे- माझ्या सासूबाई मांडी घालून जमीनीवर बसण्याचे स्वप्नही बघत नसत त्या जेवायला खाली मांडी घालून बसतात हे माझ्या घरातले उदाहरण मी बघितले आहे.
येथे कोणाची जाहिरात बाजी करण्यासाठी हे लिहिले नसून विषय निघाला आहे म्हणून लिहिले-