क्लिप आवडली राज! हा बाबाजी जर असा प्रसाद वाटू शकतो तर उजाड जमिनीवर शेतं का पिकवत नाही?
काय म्हणावं या लोकांना ??? बरं आणि ह्यांचे "अनुयायी" कोण ? तर आमचे राष्ट्रपती, आमच्या गळ्यातला ताईत क्रिकेटपटू, आमचा लाडका अभिनेता... नावं तरी किती घ्यायची?
हेच तर वाईट आहे की अश्यांनी हातचलाखीनी हातातून उदी काढली तर त्याची "बातमी" होऊन ते "देव" होतात. पण आमच्या शास्त्रज्ञांनी स्वतःच्या हिमतीवर क्रायोजेनिक इंजिन बनवल्याचं कोणाच्या गावीही नसतं.
धर्म या गोष्टीनी जितका रक्तपात घडवलाय आणि जितके हाल केलेत तितके मानवाच्या इतिहासात कशाने झाले नसतील. ह्या "अफ़ू" नी सगळ्यांना नशा चढलीये. शास्त्रीय दृष्टिकोन गेलाय तेल लावत. आम्ही अजून शनिवारी मारुतीला तेल घालणार. छे ! ह्या विषयावर लिहायचा पण कंटाळा आलाय!