अधिक माहिती या दुव्यावर मिळू शकेल. यांची योगसाधना व आयुर्वेदिय औषधोपचाराशी संबंधित मराठीतील पुस्तके महाराष्ट्रातील प्रमुख शहरात मिळतात.
या शिबिरांची शुल्के दहा हजारांपासून काहीशेहे पर्यंत असून सुमारे ६०० कोटी खर्चाचे एक योग विद्यापीठ हरिद्वार येथे बनवण्यासाठी हा खटाटोप आहे.
या व्यतिरिक्त कुठेही रामदेव बाबांच्या नावाने देणग्या दिल्या वा मागितल्या जाऊ नयेत व योगशिक्षण हे अन्यथा शुल्करहित असावे असे यांचे तत्त्व आहे असे दिसते. (आस्था वाहिनीवर जो थेट प्रसारित कार्यक्रम पाहिला जातो तो विनामुक्त समजला गेला आहे.)
चमत्कार करणारे बाबांना विरोध व दारूबंदी हे बाबांचे विशेष आवडते विषय समजले जातात. शिवाय रोग्यांना लुटणाऱ्या डॉक्टर समुदायावर प्रहार करायलाही बाबा मागे पुढे पाहत नाहीत.