वेदश्री,
म्हणते आहेस 'सध्ध्यातरी नकोचे लग्नाची बेडी !!! '
पण नाहीच का मनातल्या मनात बेडीची इच्छा थोडी??
वाहतो आहे बाहेर छान वारा, सळसळणारी झाडे करती इशारा,
"आपलेही कुणी असावे" या विचाराना मनात नाही का मिळत थारा?
निवांत एका झाडाखाली, हितगूज करी एक जोडपे,
पाहता त्यांना नाहीच उघडत हृद्यातले इच्छांचे कप्पे?
मैत्रिणींची गुपिते "तुझी शप्पथ" म्हणून जपता जपता,
"माझे गुपित कधी बनणार" ही नाही का मनी आतुरता?
सहलीत मैत्रिणींच्या घोळक्यात नाही वाटले तुला एकाकी?
स्वप्ने पाहून नकळत नाहीच का आली डोळ्यात चकाकी?
"शादी है वो लड्डू,खाये सो पछताये,न खाये सो भी पछताये"
फिर खाकर पछतानेके खयाल आपके दिलमे सचमुच नही आये????