माणूस नैसर्गिकरित्या मिश्राहारी आहे, म्हणजे मिश्राहारी
प्राण्यांची लक्षणे दर्शवतो. अप्रगत अवस्थेत माणूसही मांसाहारीच होता.
नंतर त्याने शेतीचा शोध (?) लावला.
या शोधानंतर माणसाला 'जगण्या'साठी मांसाहार करण्याची गरज उरली नाही.
(टंड्रा प्रदेशातील माणसांबद्दल हे लागू नाही, हे त्याला ठावूक आहे,
मनोगताचे वाचक तेथे नसावेत.) मांसाहाराकडून शाकाहाराकडे हा त्याचा प्रवास
तो माणसाच्या सुसंस्कृतपणाचा वा सभ्यतेचा समजतो.
'मांसाहार हा एकमेव आधार नसताना' इतर प्राण्यांना मारून खाणे हे
जिभेचे चोचले पुरवण्यासारखेच नाही का? इतर प्राणी त्याच्या माहिती प्रमाणे
चवीसाठी मांसाहार करत नसावेत, (माणसांच्या सानिध्याने काही
माकडांच्या प्रजातींनी माणसाचा हा गुणधर्म उचलला असल्यास सांगता येत नाही.)
जर प्राणी व झाडे यांच्या जिवात फरक नाही तर
माणूस व इतर
प्राण्याच्या जीवात तर तो अजिबातच नसावा. नाही का? म्हणजे कुठल्याही
प्राण्याला मारणे हे मनुष्यवधा सारखेच नाही का? मग अशा परिस्थितीत माणसाने
खावे तरी काय? का चव चांगली असल्यास माणसालाही खाण्यास हरकत नसावी?
(माहितीसाठी नवजात अर्भकेहीचवीने खाणारी माणसे या पृथ्वीतलावर आहेत.)
शिवाय आपलेच म्हणणे पुढे वाढवायचे झाल्यास 'बळी तो कान पिळी' या न्यायाने
इतर सर्व प्रजाती (ज्या आपण खात नाही, खातो त्यांची शेती करू) त्या नष्ट
करायला काय हरकत आहे?
शाकाहारातही फळे ही मुलतःच दुसऱ्या जीवाच्या पोषणासाठी बनवलेली आहेत
ज्या योगे त्यातील बीजे रुजण्यास योग्य अशा इतर ठिकाणी पोहोचतील.
धान्याबद्दल मात्र आपले 'जीवो जिवस्य जिवनम्' लागू असावे.