आधी म्हटल्याप्रमाणे हा विषय नक्कीच संवेदनशील आहे .आणी ही प्रतिक्रीया वाचल्यावर ते पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं ...

प्रथमदर्शनी मला ही प्रतिक्रीया भावनाप्रधान वाटली होती ,पण नंतर विचार केल्यावर त्यामागचा अर्थ लक्षात आला .मला २ मुद्दे पटले ते असे ..

१. शाकाहारातही फळे ही मुलतःच दुसऱ्या जीवाच्या पोषणासाठी बनवलेली आहेत ज्या योगे त्यातील बीजे रुजण्यास योग्य अशा इतर ठिकाणी पोहोचतील. (कारण मांसाहारात हे विधान लागू होत नाही.)

२. धान्याबद्दल मात्र आपले 'जीवो जिवस्य जिवनम्' लागू असावे.

१ मुद्दा पटला नाही तो असा की,

"शिवाय आपलेच म्हणणे पुढे वाढवायचे झाल्यास 'बळी तो कान पिळी' यान्यायाने इतर सर्व प्रजाती (ज्या आपण खात नाही, खातो त्यांची शेती करू) त्या नष्ट करायला काय हरकत आहे?"

हा मुद्दा मला विषयांतर करणारा आणि भावनाप्रधान वाटतो .कारण मला ,माझ्या विचारांबद्दल इथे गृहीत धरल गेलय, जे अयोग्य आहे.(विषय संवेदनशील असल्यावर हे साहजिकच अपेक्षित होते.)

फ़लाहाराबाबत ठीक आहे (फ़ळांचा ,धान्यांचा एकमेव उपयोग दुस-या जीवांच्या पोषणासाठीच होतो आणि फ़ळांमध्ये स्वतःचा जीव असतो  की नाही ह्या बाबतीत मी साशंक आहे)

पण पालेभाज्या (झाडे ) आणि इतर प्राणी ह्यांना स्वतःचा जीव असतो .मग तुम्ही त्या दोन जीवांमध्ये कुठ्ल्या कारणांमुळे फ़रक करता .आधी म्हटल्याप्रमाणे "निसर्गाने त्यांना प्राण्यांप्रमाणे भावना व्यक्त करायला आवाज नसेल दिला ,प्राण्यांप्रमाणे नाही त्यांच्या अंगात रक्त...पण आपण घेतो तो शेवटी एक जीवच ना ??? "