"शिवाय आपलेच म्हणणे पुढे वाढवायचे झाल्यास 'बळी तो कान पिळी'
यान्यायाने इतर सर्व प्रजाती (ज्या आपण खात नाही, खातो त्यांची शेती करू)
त्या नष्ट करायला काय हरकत आहे?"
हा मुद्दा मला विषयांतर करणारा आणि भावनाप्रधान वाटतो .कारण मला ,माझ्या विचारांबद्दल इथे गृहीत धरल गेलय, जे अयोग्य आहे.(विषय संवेदनशील असल्यावर हे साहजिकच अपेक्षित होते.)
याचा रोख आपल्या लेखातील "आपल्या पुर्वजांनी म्हटलेलंच आहे "जीवो जीवस्य जीवनम " ,म्हणजेच एक जीव हा
दुस-या जीवाचे जीवन आहे !! मग तो जीव एका प्राण्याचा असो वा आणि कुणाचा
,काय फ़रक आहे ..." या युक्तिवादाकडे होता.
याचा अर्थ त्याने 'ज्याची क्षमता असेल तो आपल्याहून दुबळ्या
जीवाला (प्राणी वा झाडे) आपल्या गरजेसाठीच नव्हे तर
चवीसाठी खाऊ शकतो, त्यामागची नैतिकता/योग्यायोग्यता पाहणे
गरजेचे नाही' असा त्याने घेतला.
नष्ट करने हा अर्थातच अतिरेक होता व काही अंशी अनावश्यकही.
आपल्यासारख्या
त्याच्या इतर मित्रांशी झालेल्या संवादाचा या प्रतिसादावर प्रभाव झाला
असणे अशक्य नाही. असो, मांसाहाराने माणसातली हिंसकता वाढते असे म्हणतात.
या विषयाच्या चर्चेने वाढत नसावी. गृहीत धरण्याबद्दल क्षमस्व.
.कारण मला ,माझ्या विचारांबद्दल इथे गृहीत धरल गेलय, जे अयोग्य आहे.
काळजी नसावी तो आपल्याला कच्चा खाणार नाही. मांसाहारी व्यक्तिंनाही जगण्याचा पूर्ण अधिकार आहे असे त्याचे मत आहे.
पण पालेभाज्या (झाडे ) आणि इतर प्राणी ह्यांना स्वतःचा जीव असतो
पालेभाज्यांबद्दल त्याला सहानुभूती आहे. तो 'शेपू' आजिबात खात नाही. (हे केवळ वातावरण हलके व्हावे म्हणून, पालेभाज्यांनी पोट हलके होतअसेल तर तोही भाग वेगळा.)
माणसाचा नैसर्गिक आहार काय आहे? याचे उत्तर तज्ज्ञांनी मांडावे. (म्हणजे त्यावर ताव मारता येईल.)