महाविद्यालयात असताना, जैव-रसायन शास्त्राच्या 'टेक्स्ट बुक' मधे वाचलेले आठवते. प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत हा मांसाहार आहे. तेथे पुढे असेही लिहिलेले होते की, शाकाहारातही डाळी आणी कडधान्ये या पासून प्रथिने मिळतात परंतू मांसाहाराशी तुलना करता ती दुय्यम प्रतीची असतात. त्याचबरोबर काही विशिष्ट प्रथिने ही फक्त मांसाहारातूनच मिळतात.

मत्स्याहार हा ह्रुदय रोगासाठी वैद्यकीय दृष्टिकोनातून सर्वोत्तम मानला जातो. त्यांतील ओमेगा ३ मेदाम्ले ही हृदय रोग टाळण्यास अत्यंत गुणकारी असतात.