आजकालच्या 'जीवनशैली' सदोष असल्यामुळे, निसर्गास जवळच्या नसल्यामुळे कर्करोग, हृदयरोगादी आधुनिक रोगांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू लागले. म्हणून जे अर्वाचीन संशोधन झाले आहे त्यात अनपेक्षित तथ्ये समोर आलेली आहेत. ती अशी.
माणसाची आतडी ३३ फूट एवढी लांब असते.
मांसाहार इतक्या लांबपर्यंत (जास्त वेळ) त्यात राहिल्यास कर्ककारक पदार्थ साठून आरोग्यास अपायकारक असे असाध्य रोग जडतात.
एवढी लांब आतडी शाकाहारास पचविण्याचे दृष्टीने तयार केलेली असल्याने शाकाहारासच वापरल्यास आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जगता येते.
याकरता माणसाने शाकाहार करणेच उचित.
खरेतर शाकाहार की मांसाहार हा प्रश्न शाकाहार की प्राणीजन्य आहार असा असायला हवा.
दूध, अंडी ही आपल्या आहाराचा अविभाज्य घटक झालेले आहेत. पण ती प्राणीज असल्याने अंतिमतः मनुष्यशरीरास हानिकारक असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या, निस्संदिग्धरीत्या सिद्ध झालेले आहे.
कुणाचा जीव जातो म्हणून, कुणाला वाईट वाटेल म्हणून शाकाहाराचा निर्णय घेण्यापेक्षा, स्वतःस हितकारक म्हणून घेणेच श्रेयस्कर आहे.
तसेच दूध अंडी इत्यादी पदार्थांचा वापर हळूहळू पण पूर्णतः थाबविल्यास मानवी आयुष्य शेकडो निरामय वर्षेपर्यंत वाढू शकेल असे संकेत आधुनिक संशोधनात मिळालेले आहेत.