मित्रांनो,

१. शाकाहार आणि मांसाहारतला मुख्य फरक असा की शाकाहार म्हणून आपण जे अन्न ग्रहण करतो, ते सगळे पदार्थ स्व-जीवी असतात. म्हणजे, पालेभाज्या-फळभाज्या-धान्य , स्वतःचे अन्न माती-प्रकाश-हवा यांपासून स्वतः बनवतात. मांसाहारातील घटके हे पर-जीवी असतात. हे दुसऱ्यांनी बनवलेले अन्न स्वतःसाठी वापरतात. कोणताही प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही. ( अन्न शिजवणे आणि अन्न तयार करणे यात फरक असतो, माणूस निसर्गात उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून स्वतःचे अन्न "शिजवतो" ! )

२." जीव" असतो, म्हणजे "वेदना जाणवतात" असे नव्हे. मला शास्त्रीय आधार देता येणार नाही, परंतू, प्राण्यांमधे असते तशी "संवेदना" वनस्पतींमधे नसते. तेंव्हा आहाराच्या बाबतीत प्राणी आणि वनस्पती यांना एकाच पातळीवर लेखणे चूक आहे. ( कुणा जीवशास्त्रज्ञाने जास्त प्रकाश टाकल्यास बरे होईल. )

३. हिंदू धर्माने शाकाहाराचाच पुरस्कार केलेला आहे. शाकाहार हा प्रकृतीसाठी योग्य असतो, असे सिद्धही झालेले आहे.

४. विशिष्ठ प्रदेशात, शरिरात अतिरिक्त उष्णतेसाठी, कदाचित मांआहार आवश्यक असेलही, परंतू आपल्यासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात, मांसाहाराने निर्माण होणारी अतिरिक्त उष्णता घातकच ! शक्यतो मांसाहार टाळावा.

निष्कर्ष :

बाकी, मांसाहार करायचाच असेल तर करावा ! ( अडवले कुणी आहे ? ) परंतू, वनस्पतींमधे जीव असतो, म्हणून पालेभाज्या खाणे, हाही मांसाहार, असे मूर्ख समर्थन कृपया टाळावे.

चुकीच्या संकल्पना जरूर बदलाव्यात. पण अर्धवट माहितीपोटी चुकीच्या समजुती पसरवण्यात हातभार लावण्याचे पाप करु नये, हे विनंती.