या शोधानंतर माणसाला
'जगण्या'साठी मांसाहार करण्याची गरज उरली नाही. (टंड्रा प्रदेशातील
माणसांबद्दल हे लागू नाही, हे त्याला ठाऊक आहे, मनोगताचे वाचक तेथे
नसावेत.) मांसाहाराकडून शाकाहाराकडे हा त्याचा प्रवास तो माणसाच्या
सुसंस्कृतपणाचा वा सभ्यतेचा समजतो.
या एकंदर मानवजातीच्या प्रवासावर केलेल्या भाष्याचा आपण वैयक्तिक आरोप असा अर्थ घेणार असाल तर क्षमा असावी.
(तर्काच्या भाषेत पहायचे झाले तर शेती करणे 'प्रगती'चे लक्षण असेल
तर'शेती न करणारे' समाज अप्रगत ठरतात, मांसाहार/शिकार करणारे
नव्हे.)
यामागचा अर्थ शाकाहार हा माणसाच्या प्रगतीचा एक टप्पा आहे असे म्हणण्याचा
होता. सुसंस्कृतपणाला फारतर नागरीकरणाचा म्हणू. शिवाय आपणही शेती या
शोधाचा पुरेपूर लाभ उठवत असल अशी त्याला खात्री आहे.
य:कश्चित त्याच्या निव्वळ समजण्यावर आपले असभ्य वा असंस्कृत असणे ठरत नसावे ही आशा.