ही चर्चा आजच वाचनात आली. 'माणसाचा नैसर्गिक आहार काय' असा प्रश्न वर बऱ्याच लोकांनी विचारला आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करते.

माणसाचे जवळचे बांधव कपी, चिम्पान्झी मिश्राहारी आहेत; गोरिला व ओरांगउटांग शाकाहारी आहेत. पैकी ओरांगउटांग दाट जंगलात झाडांच्या फांद्यावर राहणारे व सहसा जमिनीवर न उतरणारे, गोरिला मोकळ्या गवताळ मैदानात राहणारे तर चिम्पांझी विरळ जंगलात राहणारे. माणूस चिंपांझींच्या जंगलांपेक्षा विरळ जंगलात उत्क्रांत झाला असे मानण्यात येते.

आदिमानवाचे मुख्य अन्न जमिनीखाली दडलेली कंदमुळे, झाडावरील फळे व शिकार केलेले किंवा आयते सापडलेले (मृत) प्राणी. (यात काही शास्त्रज्ञ शिकारीच्या बाजूने तर काही मृत प्राण्यांच्या. पण मांसाहाराचा समावेश ठळक अन्नात आहे हे नक्की.) माणसाच्या उत्क्रांतीत, कपींच्या बऱ्याच जाती तयार झाल्या होत्या. काही काळ यातील काही जाती एकमेकांच्या समस्थळी-समकालीनही होत्या. यातील बऱ्याचशा जाती, त्या केवळ शाकाहारी असल्याने (योग्य अन्नाअभावी) नामशेष झाल्या.

मानवी उत्क्रांतीच्या जलकपी सिद्धांतात मासे (व फळे) हे(च!) माणसाचे प्रमुख अन्न आहे असे दाखवून दिले जाते.

शेतीच्या शोधाबरोबर पशुपालनाचा शोधही महत्वाचा आहे. एकाप्रकारे तीही अन्नाची शेतीच आहे. तेव्हा शाकाहारी शेतीतून उत्पन्न होणारे अन्न खाणारे अधिक प्रगत असे काही म्हणता यायचे नाही.