योगेशपंत,
आपण सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय चर्चेस घेतला आहे. आपण चर्चेचा प्रस्ताव अत्यंत सुंदर रीतीने मांडला आहे ह्याची खास नोंद घ्यावीशी वाटली.
आमच्या मते आपला आहार हा आपला परिसर, आपण राहतो तो भौगोलिक प्रदेश, तेथील वातावरण, अन्नाची उपलब्धता, आपल्या कामाचे स्वरूप, आपला दिनक्रम अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असावा. आपण काय खातो ह्याचा आपल्या शरीराबरोबरच मनावरही परिणाम होत असतो. तेंव्हा मांसाहार कोणी करावा व कोणी करू नये ह्याचे काही नियम असावेत असे वाटते. उदा० बैठे काम करणाऱ्या बुद्धिजीवी वर्गाने मांसाहार करण्याची आवश्यकता नाही असे वाटते. वाटेल त्या परिस्थितीत मिळेल त्या अन्नावर राहून प्रसंग आल्यास शत्रूला मारावयाची तयारी ठेवणे आवश्यक असणाऱ्या सैनिकवर्गाने मांसाहार करावा असे वाटते. बाकी वरील एकनाथराव आदी मंडळींनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेतच.
आपला
(कर्माधिष्ठिताहारवादी) प्रवासी