अहो एकनाथ काका ,मला पालेभाज्या खाणं म्हणजे मांसाहार अस कधीच म्हणायच नव्हत आणि मी तस म्हटलही नाही , (माझ्या विचारांसाठी मला पुन्हा एकदा गृहीत धरल गेलय !!!) ....

माझ इतकच म्हणण होत की प्राण्यांप्रमाणे झाडांमध्येही जीव असतो . (झाडांमध्ये मांस नसतेच ,मुळी त्यामुळे त्याला "मांस-आहार " मध्ये खचितच धरता येत नाही) .पण झाडाची हत्या म्हणजेच एका जीवाची हत्या नाही का ??? 

पुढे जाऊन मांसाहार करणं योग्य आहे की नाही हा ही माझा मुद्दा नव्हता .कारण जशा कुठल्याही नाण्याच्या दोन बाजु असतात तशा ह्या विषयाच्या सुद्धा आहेत आणि दोन्ही बाजु मला आधीच माहीत आणि पटल्या होत्या.  

फ़क्त केवळ कुठ्ल्या जीवांना मारुन खाण पटत नाही ह्या "सोज्वळ" कारणास्तव मांसाहार न करणा-या माणसांकडे माझ्या प्रश्नाचा रोख होता .. (तुम्ही माझा पहील लेखन पुन्हा एकदा नजरेखालुन घातल्यास ते तुमच्या लक्षात येईल)  इतकच !!!