योगेशभाउ, माझ्या आधीच्या उत्तरात मी हेच म्हटले आहे. तुम्ही लिहिलेले अगदी बरोबर आहे. अशी 'सोज्वळ' कारणे देणारे केवळ ढोंगी असतात. स्वतःला नसेल आवडत तर मांसाहार नका करू. अशी कारणे द्यायचे काही कारण नाही.
याचबरोबर मी फडकेसाहेबांशीही सहमत आहे की वनस्पती आणि प्राणी यांना एकाच पातळीवर समजणे चुकीचे आहे. त्यामुळे मांसाहारी लोकांचा हा युक्तिवादही चुकीचा आहे.
मनुष्य हा स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाही (माझा रोख स्वयंपाकाकडे नाही) त्यामुळे त्याला वनस्पती किंवा प्राणी यांवर अवलंबून राहावेच लागते. त्यामुळे दोन्ही प्रकारचे आहार हे मनुष्याला आवश्यक आहेत. 'केवळ' शाकाहार माणसाला पूर्णपणे सात्त्विक आहार देऊ शकत नाही त्याचप्रमाणे 'केवळ' मांसाहार माणसाला संपूर्ण आहार देऊ शकत नाही. दोन्हीचा आहारात समतोल असणेच आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे.
--ध्रुव.