शेरलॉक होम्सच्या गोष्टी आणि डॉयलची लेखनशैली उत्तमच. मला आवडलेल्या काही गोष्टी:
१. The speckled band- यात त्याने भारतीय अतिजहरी साप 'मण्यार' एक माणूस त्याच्या सावत्र मुलीना मारण्यासाठी वापरतो आणि शेवटी साप त्याच्यावरच उलटतो ते सांगितले आहे.
२. The kornish horror- अत्यंत दुर्मिळ आणि विषारी मुळीच्या धुराने इस्टेटीत वाटेकरी आपली बहिण आणि दोन भाऊ यांचा काटा काढणारा माणूस आणि त्या विषाचा स्वत:वर जिवघेणा प्रयोग करुन हे शोधून काढणारा होम्स.
३. The dying detective-डबीतून टोकदार स्प्रिंगच्या युक्तीने शेरलॉक होम्सला अत्यंत घातक रोगाची लागण करु इच्छीणार्‍या माणसाला स्वत: मरणोन्मुख असल्याचे नाटक करुन पकडणारा होम्स.
४. The final problem-शेरलॉक होम्सला भेटलेला सवाई खलनायक आणि त्याने स्वत: आणि होम्सला संपवण्यासाठी केलेला प्रयत्न.
५. The twisted lip-चांगले उत्पन्न म्हणून कुरुप भिकार्‍याचा वेष घेउन पैसे कमावणारा आणि नंतर स्वत:च्याच खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेला पत्रकार आणि होम्स.
६. The silver blaze-चोरीला गेलेला यशस्वी रेसचा घोडा, प्रशिक्षकाचा झालेला खून आणि त्यामागचे रहस्य शोधणारा होम्स.

मी अजून "Hound of Baskerwhilles"वाचू शकले नाही. कोणी मला त्याची गोष्ट सांगू शकेल काय?

(रहस्य-भयकथा प्रेमी) अनु.