शाळेचे मुक्तानंद हे नावच मुळी आल्हाददायक वाटले... (आता पुन्हा प्रश्न.. अल्हाद म्हणजे काय? की आल्हाददायक हाच पूर्ण शब्द होतो? वातावरणच आल्हाददायक होऊ शकते का?)

अजूनही येऊ देत अशाच गमती जमती..

त्याला त्याच्या शाळेत ७ वीत बहुदा, संस्कृतच्या शिक्षकांनी केलेली शिक्षा अजूनही आठवते.

झालं काय.. तो आणि त्याचा मित्र योगेश दोघे पहिल्या बाकावर बसलेले. कुठल्यातरी भल्यामोठ्या माशाचा उल्लेख असलेली कथा की सुभाषितमाला चाललेली.

झालं. भरकटले दोघे. योगेश त्याला मोठमोठ्या माशांबद्दल, शार्क बद्दल माहिती सांगत होता, तो तल्लीन होऊन ऐकत होता. 

इतक्यात शिक्षकांचं लक्ष त्यांच्या कडं गेलं. 

दोघांना वर्गासमोर कैद्याप्रमाणे हजर करण्यात आलं, जबान्या झाल्या, कबूली जबाब झाले, त्याला माफीचा साक्षीदार होण्याच्या आशेवर, "खर्रं सांग.. काय बोलत होता.." असं दरडावूनही झालं. पण आमचे जबाब मुरलेल्या गुन्हेगाराप्रमाणे ठरलेले. (काय करणार खरं तेच सांगत होता तो).

शिक्षकांना याहूनही अधिक विषयांतर अपेक्षित असावे. त्यांच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. आता त्यांच्या गुन्ह्यासाठी वर्गाला धारेवर धरण्यात आलं. सत्य बाहेर येईपर्यंत पुढील भाग शिकवण्यात येणार नाही असं जाहीर झालं. पण त्याची सत्यनिष्ठा ढळली नाही. शेवटी त्याच्या मित्राच्या पालकांच्या हस्तक्षेपाने तिढा सुटला.

मात्र यानंतरही ती चर्चा काय होती या बद्दल मित्रमंडळीत बरेच दिवस उत्सुकता होती.

(यात गमतीजमती म्हणावे असे काही आहे का? नाही? काय हरकत आहे, नाव 'मी आणि शाळेतील गमतीजमती' आहे, 'तो आणि शाळेतील  गमतीजमती' थोडेच ;) तो खरं ते सांगायला नाय घाबरत...विषयांतर असो वा नसो.)