त्याने वरील 'विचार' आपली 'विचार' म्हणून खपवायचा प्रयत्न केला असल्यास क्षमा असावी. (त्याच्या मते ती भाषांतरीत वाक्ये होती, विआचार शब्दबद्ध करण्याचा प्रयास नव्हे... तीच फेरफार करून त्याने लिहीली असती तर आपल्या म्हणण्यात तथ्य होते, अर्थात त्या सद्ग्रहस्थांनी मराठीत भाष्य न केल्याने भाषांतराची मोकळीक त्याने घेतली इतकेच.)
चला, 'माणसाच्या 'विचारांवर' त्याने घेतलेल्या शिक्षणाचा, त्याच्या वाचनाचा, त्याच्यावर ज्या व्यक्तिंवर प्रभाव आहे, ज्या व्यक्ति त्याला आदरणीय आहेत, ज्यांच्याबद्दल त्याला आदर आहे, त्यांच्या 'विचारांचा' परिणाम होतो. माणसाचे 'स्वतःचे असे विचार' वगैरे वेगळे शोधणे कठिण आहे.' यावर आपले एकमत होते का पाहू. अर्थातच हा विचार पूर्णणे त्याचाच असेल असा त्याचा दावा नाही.
या वरून आपल्याला एकूण शाकाहार वा मांसाहाराबद्दल इतर तज्ज्ञांपेक्षा 'त्या'चे वा इतर मनोगतींचे काय विचार आहेत हे पाहणे महत्वाचे वाटते हीच काय ती समाधानाची बाब.
शेवटी तुकोबांनी म्हटलेच आहे... अर्र... चुकलो, चुकलो....