माझ्या मते, आपले विचार हे 'आपले' असतात. त्याच्या समर्थनासाठी कोणा दुसऱ्याच्या (दुसरा माणूस कितीही मोठा असला तरी) विचारांचा आधार कशाला घ्यायचा?
आपले विचार आणि मान्यता यात मूळचे "आपले" किती असतात? जे विचार/मान्यता आहेत ते सर्व "आपल्या"लाच सुचलेले आहेत का?
आपल्याला व्यक्तिशः सुचलेले विचार आपल्या एकूण विचारांच्या तुलनेने नगण्य असतात. बहुसंख्येने असतात आपण ऐकलेले, वाचलेले, पाहिलेले आणि आपल्याला "पटलेले" विचार. उदाहरणार्थ मांसाहारामुळे प्रथिने मिळतात हा आपण शोध लावलेला नाही किंवा मला/तुम्हाला सुचलेले नाही, तर आपण ऐकलेले/वाचलेले आणि आपल्याला पटलेले विचार आहेत.
सांगण्याचा उद्देश असा, आपले विचार हे बव्हंशी दुसऱ्यांचे आपल्याला पटलेले विचार असतात. बघा पटते का? :)