विषयांतर होते आहे तरी एक स्पष्ट करावेसे वाटते, जे विचार आपल्याला 'पटलेले' असतात ते कोणा एका व्यक्तिकडून आलेले नसतात. तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपण पाहिलेले, ऐकलेले असतातच, परंतु यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यावर विचार करून आणि अनुभवाने आपण स्वीकारलेले असतात. माझे म्हणणे एवढेच आहे की "कोणी 'अबक' नावाचा मोठा माणूस असे म्हणाला म्हणून माझेही असेच मत आहे" असे सांगणे कितपत योग्य आहे? उद्या मी उठून असे म्हणेन की 'अहिंसा परमोधर्मः' आणि गांधीजींचाही मला पाठिंबा आहे. हे योग्य आहे का? (केवळ उदाहरणादाखल. हलकेच घ्या.)

पुलंनी म्हणल्याप्रमाणे, मोठी माणसे काही वेगळे सांगत नाहीत, पण ती मोठी असतात हे महत्वाचे !

--ध्रुव.