वनस्पती आणी प्राणी यामध्ये मूलभूत फ़रक आहे. आपण सर्वजण शाळेमध्ये हे शिकलोच आहोत.
वस्तुतः मनुष्य अथवा इतर प्राणी कुठलीही निर्जीव वस्तु
खाऊ अथवा पचवू शकत नाहीत. वनस्पती व
प्राणी दोघेही १००% सजीवच आहेत.
आपण जे जे खातो ते सर्व सजीवच असतात.
(सजीवांमधे प्रजोत्पादन हा सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे.)
निर्जीव पदार्थांमध्ये वाळू, दगड, काच, लोखंड इ. येतात. आपल्यापैकी कुणी हे खात असल्यास मला कल्पना नाही.
आता प्रश्न मांसाहार की शाकाहार?
मांसाहारी प्राण्यांमधील काही प्रमुख लक्षणे -
१. कच्चे मांस तोडण्यासाठी धारदार सुळे/नखे.
२. कमी लांबीचे पण शक्तिशाली आतडे.
३. अन्न शक्यतो चावले न जाता गिळले जाते.
४. पचनक्रिया पूर्णतः आतड्यांवरअवलंबून.
५. लाळेमध्ये पाचक रस नसतात.
अधिक माहितीसाठी वाचा
शाकाहारी प्राण्यांमधील काही प्रमुख लक्षणे -
१. अन्न नीट चावले (grind) जावे यासाठी जबड्याची विशिष्ट रचना. सुळे शक्यतो नसतात.
२. शरीराच्या कित्येक पट लांब (+10x) आतडे.
३. अन्न पूर्ण चावून मगच गिळले जाते.
४. पचनक्रिया अनेक (३ ते ५) भागांमधे विभागून होते. (तोंड, जठर, लहानआतडे, मोठे आतडे, इ.)
५. लाळेमध्ये कर्बोद्के विरघळवणारे पाचक रस असतात.
अधिक माहितीसाठी वाचा
शरीरशास्त्राचा बारकाईने अभ्यास केला तर असेच दिसुन येते की निसर्गाने मानवी शरीर-रचना ही शाकाहारासाठी योजलेली आहे.
राहता राहिला प्रश्न प्राणिज पदार्थांचा.
मनुष्य सोड्ल्यास इतर कोणताही सस्तन प्राणी दुसरया प्राण्याचे दूध पीत नाही.
निष्कर्ष -
निसर्गात प्रत्येक प्राण्याचे खाद्य ठरलेले आहे. प्रत्येक सजीव या
अन्न-साखळीचा घटक असतो. जर खाद्य कमी झाले तर तो प्राणी हळूहळू नामशेष
होतो.
शिवाय प्रत्येक प्राणी हा निसर्गनियमानुसारच वागत असतो. अपवाद फ़क्त माणसाचा!