शाकाहार अथवा मांसाहार ज्याला जे पटेल/आवडेल ते करण्याचा पूर्ण अधिकार
आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांनी आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये
असे वाटते.
"तुम्ही मांसाहार का करता?" असा प्रश्न विचारला तर त्याचे खरे
उत्तर "मला आवडले/ते" असे असावे. मी प्रोटिन्स आणि लोह मिळवण्यासाठी खातो
चवीशी काही देणेघेणे नाही असे जे म्हणतात त्यांनी आवश्यक तितकेच खाल्ले
पाहिजे नाहीतर हा ढोंगीपणा होईल.
बऱ्याचश्या (सर्व नाही) मांसाहारी लोकांना एक सवय असते, आपल्या
शाकाहारी मित्राला/मैत्रिणीला विचारायचे तू का "खात" नाहीस, आणि काही कारण
ऐकले की ते कसे चुकीचे आहे हे सांगायचा प्रयत्न करायचा किंवा भाज्या आणि
मांस सारखेच आहेत हे सिद्ध करायचा प्रयत्न करायचा. याचे कारण काय
असावे बरे? बऱ्याच लोकांना (साऱ्यांना नाही) आपण मांसाहार करून काहीतरी
चुकीचे करतोय अशी आंतरिक टोचण असते (ती सामाजिक कारणांमुळे असेल) त्याचे
समर्थन करून ती टोचण कमी
करण्याचा केविलवाणा प्रयत्न काहीजण (सर्व नाही
:) करत असतात. हेच काही (सर्व नाही) शाकाहारी लोकांनाही लागू
आहे,
थोडक्यात दुसऱ्या व्यक्तींच्या मतस्वातंत्र्याचा आदर करावा आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जगू द्यावे.