विषय छान आहे. जिव्हाळ्याचा आहे.

सृष्टीचा माझा अनुभव काही विशेष चांगला नाही. मासे ठीक होते पण तेल जास्त वापरले होत. गार्निशिंगमध्ये तो मासा गुदमरून मेला होता. मटन अधिक शिजलेले आणि अतिशय बेचव होते. सृष्टी ओवररेटेड आहे आणि इथले जेवण ओवरप्राईस्ड(दोन्ही शब्दांचे मराठी पर्याय सुचवावे) आहे.

मोठ्या उपहारगृहांत फ्रिझरचा वापर करतात. १५-१५ दिवस मांस तिथे पडलेले असते. अश्यावेळी दर्जाची काही खात्री नाही. जिथे गर्दी भरपूर आणि मालाच उठाव अधिक तिथे जाणे सुरक्षित.

चांगल्या उपहारगृहांत अश्यावेळी ग्राहकांनी तक्रार केल्यावर पैसे तर घेत नाहीतच पण शिवाय एखादी दुसरी नवी डिश देतात. पण असे काही सृष्टीमधे घडले नाही. मला वाटते मध्यमवर्गीय ग्राहक ज़रा तक्रार करायला घाबरतोच. जणू खाऊ घालणारा पैसे घेऊन खायला देऊन आमच्यावर उपकार करतो आहे.

पैसे मित्राने भरले. पण सृष्टी म्हणजे नाम बड़े और दर्शन छोटे. पैसे वसूल काही झाले नाही.

पुरेपूर कोल्हापूर नवेच उघडलेले आहे. तिथे जायचे आहे. त्याच लायनीत शांभवी आणि त्याच्यापुढे आणखी एक कोल्हापुरी उपहारगृह आहे. बरी आहेत.

दुर्गा ठीक. गोपीचे माहीत नाही. पण दम बिर्याणी खायची असेल तर कँपात जावे ह्या मताचा मी आहे. असो.

चित्तरंजन