आदरणीय नरेंद्रपंत,

आपली लेखमाला आम्ही अज़ून पूर्ण वाच़लेली नाही पण जेवढी वाच़ली ती च़ांगली वाटली. ह्यायोगे मराठी प्रतिशब्दांची सुंदर चर्चा घडून येत आहे हे पाहून आनंद वाटला.

बियॉन्ड मेझरमेंट लिमिटस = मापनसीमापार
मापनातीत हा शब्द कसा वाटतो?

अस्खलित हा शब्द फ़्लुएंट ह्या अर्थाने वापरला ज़ात असल्यामुळे कंटिन्युअस साठी वरदा ह्यांनी सुच़वलेले सलग व अखंड हे शब्द योग्य वाटतात.

कन्व्हेन्शनल = पारंपारिक
पारंरिक असा शब्द आहे असे वाटते.

इझी टू कंस्ट्रक्ट = रचनासहज
सुरच्य, सुरचनीय

ऋणाणू, धनाणू, विरक्ताणू हे शब्द आवडले पण अणू च्या ऐवजी त्यांना अणुक म्हणणे जास्त च़ांगले वाटते.

फास्ट = दृत
द्रु(द् + रु)

ह्यूज = अजस्त्र
अजस्र (स् + र)

पोर्टेबल = जंगम, सुटसुटीत
वहनीय

रिऍलिटी = तथ्य
वास्तव योग्य वाटते.

सिम्बॉल = चिन्ह
चिह्न (ह् + न) अर्थात ह्यावर एक वेगळा वाद च़ालू आहे.

प्रतिशब्द मराठीत व हिंदीत सारखेच असावेत हे आपले मत पटले. किंबहुना सर्व भारतीय भाषांत शास्त्रीय शब्दांचे प्रमाणीकरण व्हावे असे वाटते.

आपला
(प्रमाणवादी) प्रवासी