आपला मुद्दा असा होता की वनस्पती आपले अन्न स्वतः निर्माण करतात म्हणून त्यांना खाल्लेले चालेल. पण प्राण्यांना तसे करता येत नाही म्हणून त्यांना खाणे अयोग्य. हा मुद्दा मला आजिबात पटलेला नाही.
ज्या जीवाला खातो तो आपले अन्न कसे मिळवतो हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे. त्यातही अळंबी वगैरे मंडळी अन्नाच्या बाबतीत परावलंबी असतात. मग त्यांना खाणे मांसाहार समजायचे का? काही वनस्पती तर चक्क किडे वगैरे पकडून खातात (व्हीनस ट्रॅप, पिचर प्लँट) त्यांचे काय? बांडगूळासारख्या वनस्पती दुसऱ्या झाडाचा रस पिऊन जगतात, वाढतात त्याचे काय?
वनस्पतींना संवेदना असतात असे वाचल्याचे आठवते. प्राण्यांइतक्या ठळकपणे दिसत नसल्या तरी त्या असतात असे मला वाटते.
जीवोजीवस्य जीवनम् हेच खरे. वनस्पती आणि प्राणी ह्यांची तुलना करायला आजिबात हरकत नाही.
शाकाहार आणि मांसाहार ह्यात डावे उजवे करायचे असेल तर ते होणारच. ते का म्हणून टाळायचे?